About Us

leaf-free-img
D
organic-badge-freeimg

Certified Products

We deal with various quality organic products!

logo-leaf
  • करडई तेल

  • शेंगदाणा तेल

  • तीळ तेल

  • मोहरी तेल

  • नारळ तेल

  • सैंधव मीठ

About Shuddhaoilmill

शुध्द आॅईल मिल (रसायन मुक्त लाकडी घाण्याचे शुध्द तेल) मागील 30-40 वर्षांपूर्वी किराणा दुकानावर तेल मिळत नव्हते, प्रत्येक जण गावातील तेली माणसाकडे जाऊन शुध्द तेल घेत होता, हे तेल सुगंधित चवदार व पौष्टिक होते, काही जण तेल्याकडे शेंगदाणे नेऊन तेल काढुन आणत असत, साधारण तीन किलो शेंगदाण्यात एक किलो तेल निघत असे, या मध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया (फिल्टर/रिफांईड) होत नसत, त्यामुळे मधुमेह रक्तदाब हृदय विकार होत नसे.
कालांतराने बरेच जण शहरात राहायला आले तेथे तेली खुप कमी होते, त्याचा फायदा तेल कंपन्यांनी घेतला व पाकीटबंद तेल विकणे सुरू झाले.

About Shuddhaoilmill

रिफाईंड ची प्रक्रिया कशी आहे हेच लोकांना माहीत नाही व लोकांनी ती कधी माहिती करून घेतली नाही, अज्ञानातच सुख मानले कारण शेंगदाण्यापेक्षा स्वस्त त्यांचे तेल मिळत होते, लोकांचे पैसे वाचत होते म्हणुन लोक खुष होते, हिच किड गावापर्यंत पोहचली व तेली लोकांकडून तेल घेणे बंद झाले.
तेली लोकांनी त्यांचे घाणे बंद करून भंगारात विकले, त्यामुळे कंपन्यांना रान मोकळे झाले, 15 - 20 वर्षे रिफांईड तेल खाल्याने आजार होऊ लागले व अनुवंशिकतेच्या नियमानुसार पुढील पिढीत संक्रमित झाले. तेलात वाचवलेला सगळा पैसा दवाखान्यात जाऊ लागला आणि मरेपर्यंत गोळ्यांवर जगावे लागुन लोकांचे आयुष्य कमी झाले व पुर्ण एक पिढी बरबाद झाली.

About shuddhaoilmill

काही वर्ष वरील सर्व गोष्टींचा अभ्यास करून व स्वर्गीय राजीव दिक्षित यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही लाकडी घाण्याचे शुध्द तेल तयार करू लागलो व याचा खुप चांगला प्रतिसाद समाजाकडून मिळत आहे, रिफांईड तेलामध्ये 10 - 12 प्रकारची केमिकल व पामतेलाची भेसळ करून विकले जाते, ही भेसळ 10 लिटरला 9 लिटरची असते, हे भेसळीचे तेल कधी कधी गाडीच्या इंजिन मध्ये वापरलेल्या आॅईल पासुन व जनावरांच्या चरबी पासुन तयार करतात म्हणुन ते भेसळीला परवडते.
हे लाल पाण्यासारखे दिसणारे तेल/विष विविध आजारांना आमंत्रण देते. आम्ही लाकडी घाण्याचे तेल लोकांच्या डोळ्यासमोर काढतो. ग्राहकांनी लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करून सुदृढ, निरोगी व उदंड आयुष्य जगावे, हिच आमची सदिच्छा !!!

About Us

We Are SHUDDHA OIL MILL Based In Chandan Nagar Pune Location. We Provide Services Of Chemical Free Pure Oil (Made In Wooden Ghaana) Such As Groundnut Oil, Sesame Oil, Mustard Oil, Safflower Oil, Coconut Oil & Saindhav Salt.

07 (1)

SHUDDHA OIL MILL